सिंदखेड राजा : येथील हजरत गोसे आजम दस्तगीर बाबा दर्यावरती दरवर्षी कॅन्सर पेशंट करिता मोठ्या प्रमाणात तपासणी शिबिर आयोजन करण्यात येत असते. यामध्ये देशभरातील प्रसिद्ध असलेले डॉक्टर उपस्थित राहून कॅन्सर पेशंटना तपासणी करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करत असतात. मात्र यावर्षी जगभरात असलेल्या कोरोना महामारी संकटामुळे हजरत गौस-ए-आजम दस्तगीर बाबा दर्गा उर्स शरीफ आणि निशाण तथा मिरवणूक रद्द करण्याचा निर्णय संस्थेच्या वतीने घेण्यात आला आहे. मिरवणूक व यात्रा न घेता यावर्षी महाराष्ट्र राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे,त्या अनुषंगाने रक्तदान करण्याचे आव्हान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याचा आवाहनाला प्रतिसाद देत यावर्षी राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वधर्मसमभावाचे प्रेरक प.पु. गुरुवर्य अल्हाज असदबाबा यांच्या पावन स्मृतीप्रित्यर्थ हजरत गौस-ए-आजम दस्तगीर बाबा बहुउद्देशीय संस्था आणि आसनाज हेल्थकेअर एज्युकेशन अँन्ड रिसर्च फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 24 डिसेंबर गुरुवार रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.सदर शिबिर हे कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाने आखलेल्या नियमानुसार घेण्यात येणार आहे.तरी या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त संख्येने युवकांनी स्वच्छेने रक्तदान करावे असे आवाहन आयोजक डॉ. अमजद खान पठाण कर्करोग शास्त्रज्ञ मुंबई यांनी केले आहे
previous post
next post