खामगांव : लॉकडाऊन काळातील संपूर्ण विज बिल माफ करावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज खामगाव येथील महावितरण कार्यालयाला ताळे ठोको आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांच्या नेतृत्वाखाली खामगाव येथे महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करून ‘स्वाभिमानी’च्या वतीने कुलूप ठोकण्यात आले. ग्राहकांना अव्वाच्या सव्वा विजबिल देणाऱ्या महावितरणचा यावेळी निषेध करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.राजू शेट्टी साहेब व चळवळीतील जेष्ठ नेते एन.डी. पाटील सर यांच्या नेतृत्वात आज राज्यभर वीजबिल माफीसाठी आंदोलन करण्यात आले आहे.

जर सरकारने वीजबिल माफ केले नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि दिवाळी ही महावितरण कार्यलायत साजरी करू असा इशारा श्याम अवथळे यावेळी यांनी दिला.या आंदोलना दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. यावेळी आंदोलनात अतिष पळसकर,निलेश देशमुख,शिवा म्हसने,सपना वानखडे, कल्पना गायगोळ,गोपाळ ताठे,निलेश गवळी,रमेश कलाम, शेख युनूस,गुलाब हटकर,अमोल पाटील,सोपान खंडारे,विष्णू जुमळे,प्रवीण दिवनाळे,निरऊत्ती मांडवेकर,समाधान जुमळे, मुरलीधर तोंडे, तुळशीदास कोकाटे,रमेश दरेकर,अभिषेक ताठे,विशाल ताठे,यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.