खामगाव:मराठवाड्यातील वसंतराव नाईक सोयाबीन सर्वात महत्वाचे नगदी कृषी विद्यापीठाचे आवाहन पीक असून शेतकऱ्यांची आर्थिक सुधारणा या पिकाच्या उत्पादनावर अवलंबून आहे.या वर्षी बऱ्याच ठिकाणी पावसाच्या उशीराच्या आगमनाने पेरणीस उशीर झाला होता.तसेच जुलै महिन्यातील व ऑगष्टच्या पहिल्या आठवडयात होणारा सततचा रिमझीम पाऊस तसेच ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.खोडमाशीमुळे जवळपास ५० टक्केपर्यंत सोयाबीनच्या उत्पादनात घट येऊ शकते.त्यामुळे शेतकरी बंधूनी वेळीच जागरूक राहून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा असे आवाहन वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील कृषी कीटकशास्त्रज्ञ प्रा.डॉ.पी.एस.नेहरकर, डॉ.ए.जी.लाड,डॉ.राजरतन खंदारे,डॉ . योगेश मात्रे यांनी केले आहे . खोडमाशीचा प्रादुर्भाव सोयाबीनची उगवण झाल्यापासून कधीही होऊ शकतो . पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत जर झाडाचा शेंडा सुकून खाली झुकलेला आढळला तर त्यावर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाला असण्याची दाट शक्यता असते . अळी पान पोखरून शिरेपर्यंत पोहचून शिरेतून पानाच्या देठामध्ये शिरत व शेंडा मधोमय कापल्यास आत मध्ये मागच्या लहान पिवळी , तोडाच्या बाजूने टोकदार , बाजूने गोलाकार व पाय नसलेली अळी जमिनीच्या बाजूने डोके करून म्हणजेच खालच्या दिशेने खोड पोखरत जात असलेली दिसते . रोप मोठे झाल्यावर या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास मात्र तो लवकर लक्षात येत नाही व शेवटी फक्त प्रौढ माशी निघून छिद्र फांदीच्या खोडाजवळील बाजूस दिसते . बऱ्याचदा झाड शेवटपर्यंत हिरवे राहते . परंतु,शेंगा भरत नाहीत.वेळीच उपाययोजना न केल्यास ५० टक्केपर्यंत उत्पादनात घट येऊ शकते.
खामगाव चिखली जळगांव जामोद जिल्हा नांदुरा बातम्या बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मेहकर मोताळा लोणार विदर्भ व्यापारी शेगांव शेतकरी संग्रामपूर सामाजिक सिंदखेड राजा