‘होप्स प्रॉपर्टी सर्व्हिसेसचा’ स्तुत्य उपक्रम…
खामगांव : देशभक्तीने प्रेरित प्रत्येक भारतीय नागरिकाला देशासाठी काहीतरी करावे असे वाटत असते. परंतु काय करावे? असा प्रश्न सहज निर्माण होतो.मात्र आपण आपल्या व्यवसायाच्या माध्यमातूनही देश सेवा करू शकतो हे होप्स प्रॉपर्टी सर्व्हिसेसचे संचालक संदीप (बंटी) पहुरकर यांनी दाखवून दिले असून एक नवीन आदर्श देशभक्तांसाठी निर्माण केला आहे.भारतमातेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांची सेवा करूनही देश सेवेत खारीचा वाटा उचलण्याचा उपक्रम बंटी पहुरकर यांनी १५ ऑगस्ट २०२३ स्वातंत्र्य दिनापासून सुरु केला आहे.संपूर्ण महाराष्ट्रात प्रॉपर्टी संदर्भात २४ तास सेवा देणाऱ्या होप्स प्रॉपर्टी सर्व्हिसेसच्या माध्यमातून सैनिकांना प्रॉपर्टी खरेदी- विक्री करावयाची असल्यास तसेच, प्रॉपर्टी बद्दल माहिती हवी असल्यास विनामुल्य सेवा देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकं सैनिकांनी मो नं. ९९७०४२७२९५ व ८२०८१३८७६३ यावर संपर्क साधावा,असे आवाहन बंटी पहूरकर यांनी केले आहे.