१ डिसेंबर ला अग्रवाल हॉस्पीटलचा वर्धापन दिन
खामगांव : ‘रुग्णसेवा हिच खरी ईश्वर सेवा’ असा ध्येय ठेऊन मोठ्या शहरात न जाता आपल्या जन्मभुमी खामगांव शहरात तिन पिढ्यांची सेवेची परंपरा तेवत ठेवण्याकरीता येथील जेष्ठ पत्रकार जगदीश अग्रवाल यांचे सुपुत्र डॉ. नितीश अग्रवाल यांनी दोन वर्षापुर्वी सर्व सोयीयुक्त अद्यावत अशा अग्रवाल हॉस्पीटल चा नांदुरा रोड येथे शुभारंभ केला होता. डॉ. नितीश अग्रवाल यांनी नाशिक, मुंबई आणि ऑस्ट्रेलिया येथे चार वर्ष रुग्णसेवा दिल्यानंतर मागील दोन वर्षापासुन खामगांव सोबतच आयकॉन हॉस्पीटल अकोला येथेही सेवा देत आहेत. मागील दोन वर्षात अनेक गुडघा बदली शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया तसेच हाडाच्या अनेक जटील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करुन नावलौकिक प्राप्त केला आहे.

तसेच खामगांव शेगांव व अकोला येथे अनेक निःशुल्क तपासणी करून मार्गदर्शन शिबीर आणि मोफत औषध वितरण करण्यात आले आहे. बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील अस्थि रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी मेट्रो सिटीज मध्ये जाऊन मोठा खर्च आणि त्रास होऊ नये याकरीता खामगांव आणि अकोला येथे सर्व सोयीयुक्त सेवा देण्याचा मानस यावेळी डॉ. नितीश यांनी व्यक्त केला आहे. रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक यांचेकडून प्रचंड प्रतिसाद आणि आशीर्वाद मिळत असल्याचेही त्यांनी द्वितीय वर्धापन दिनाच्या निमीत्याने सांगीतले. डॉ.नितीश अग्रवाल यांचेकडून अशाप्रकारे रुग्णसेवा घडत राहण्यासाठी व उद्या होणाऱ्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त अनेक मित्र मंडळी व परिचितांनी शुभेच्छा दिल्या आहेत.