१ लाख २० हजार रूपयाची मागणी..? केल्याचा आरोप
खामगांव: येथून जवळ असलेल्या आंबेटाकळी येथील एका युवतीचा इंस्टाग्राम व फेसबुक वर कोणी अज्ञात व्यक्तिने फेक आइडी तयार केला होता. याप्रकारणी त्या युवतीने हिवरखेड पोलीस स्टेशन मधे तक्रार देण्यात आली होती. त्या फेक आयडी चा तपास बुलडाणा येथील सायबर क्राइम विभागाकडे देण्यात आला होता. त्या फेक आइडीला आंबेटाकळी येथील काही युवकानी फॉलो केले होते व त्या पोस्ट ला लाइक सुद्धा केले होते. त्यानंतर याप्रकरणी बुलडाणा येथील सायबर क्राइम विभागाचे पिआय प्रदीप ठाकुर यांनी फेक आयडी ला फॉलो करणाऱ्या १२ युवकांना २-३ दिवसांपूर्वी चौकशी करण्यासाठी हिवरखेड पोलीस स्टेशन मधे बोलावण्यात आले होते. यावेळी त्या युवकांवर सायबर क्राइम अंतर्गत गुन्हा दाखल न करण्याकरीता प्रत्येकी १० हजार रूपयांची मागणी केली असल्याची चर्चा आंबेटाकळी गावात व परिसरात सुरु आहे. याबाबतची शहनिशा करण्यासाठी निर्भिड स्वराज्य च्या टीम ने हिवरखेड पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रविण तड़ी यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, असा कुठलाही गुन्हा हिवरखेड पोलीस स्टेशन मधे दाखल नाही आहे. याचा तपास सायबर क्राइम विभाग बुलडाणा यांच्या कडे दिला आहे.
यानंतर साइबर क्राइम चे पिआय प्रदीप ठाकुर यांना निर्भिड स्वराज्यने फोन लावले, मात्र पिआय ठाकुर यांनी फ़ोन उचलण्याचे कष्ट सुद्धा घेतले नाही. त्यांनी कॉल उचलला नाही म्हणून यासंदर्भात जिल्ह्या पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन लागला नाही. निर्भिड स्वराज्य टीम ने परत पिआय ठाकुर यांना पुन्हा कॉल लावला असता त्यांनी कॉल उचलला व निर्भिड स्वराज्य ने याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. व सदर प्रकरणातील त्या १२ मुलांना चौकशी साठी बोलावले होते. त्यांच्याकडे कोणतीही पैश्याची मागणी केली नाही. मात्र एका पोलीस स्टेशनचे ठानेदार म्हणत आहे की गुन्हा दाखल झाला नाही तर दुसरे पिआय म्हणतात की या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कोणीही नेमके याबाबत सविस्तर बोलायला तयार नाही आहे. सर्व प्रकरणात सायबर क्राइमचा गुन्हा दाखल न करण्यासाठी १ लाख २० हजार रूपयाची मागणी करणारा नेमका कोण ? याचा तपास जिल्हा पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी यांनी घेतला पाहिजे. व सोबतच या फेक आयडी प्रकरणाचे नेमके गौडबंगाल क़ाय आहे हे शोधायला हवे..