नागरिकांना जवळून पाहण्याचा आला अनुभव
बुलडाणा : सापांच्या प्रणयक्रीडेचा एक विशिष्ठ कालावधी असतोय, त्यामुळे त्यांची प्रणयक्रीडा पाहणे हे दुर्मिळ आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सागवान येथे धामण जातीच्या सापांची प्रणयक्रीडा पाहण्याचा योग गुरुवारी सायंकाळी गावातील अनेकांना जवळून अनुभवता आला आहे. साधारण मार्च – एप्रिल महिन्यात सापांचा मिलनाचा काळ असतो, दरम्यान सागवान येथील संगीता जाधव यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत दोन दिवसांपूर्वी सायंकाळी धामण जातीच्या बिनविषारी सापांची प्रणयक्रीडा सुरु असल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि पाहता पाहता याठिकाणी गर्दी झाली.
दोन्ही सापांनी एकमेकांना विळखा घातला होता आणि ३ ते ४ फूट उंच शरीर करून फण्यांना स्पर्श करत होते. गावातील अनेकांनी हा दुर्मिळ अनुभव पहिला. या सापांविषयी आणि मिलनाविषयी अनेक गैरसमज आहेत, सापाचं मिलन पाहिले कि धनलाभ होतॊ अशिही आख्यायिका आहे. यानंतर सर्पमित्र श्रीराम रसाळ यांनी या दोन्ही सापांना पकडून जंगलात सोडले.