टिप्पर पलटी झाल्याने 13 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी
सिंदखेडराजा : जिल्ह्यात समृद्दी महामार्गाचे काम चालू असून तालुक्यातील तढेगाव – दुसरबिड मध्ये समृद्धी कॅम्पच्सा जवळ टिप्पर पलटी झाल्याने अपघात झाला आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरु आहे आणि रस्त्यावरून जाताना चिखल असल्याने टिप्पर घसरले आणि पलटी झाले. यामधून १६ मजूर प्रवास करत होते, यावेळी टिप्पर पलटी झाल्याने हे मजूर त्याखाली दबल्या गेले.
टिप्पर मध्ये मजुरांसोबत महामार्गाच्या कामाच्या लोखंडी सळई सुद्धा होत्या, त्या अंगावर पडल्याने यात १३ मजुरांचा मृत्यू झाला आहे तर ३ मजूर जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात हलविले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तर दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी याठिकाणी केली होती. जे मजूर मृत झालेय ते बाहेर राज्यातील असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे यातून एक लहान मुलगी वाचली असल्याची माहिती आहे.