November 20, 2025
क्रीडा खामगाव बुलडाणा सामाजिक

समता क्रिडा मंडळाची भिमजयंती उत्सव समितीची कार्यकारणी गठित

अध्यक्षपदी विश्वजीत गव्हांदे तर सचिवपदी सचिन गाडेकर

खामगाव:-शंकर नगर भागातील समता क्रिडा मंडळाने दरवर्षी प्रमाणे यंदाही भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती महोत्सवाची कार्यकारणी समिती गठित करण्यात आली. मागील २ वर्षांपासून कोरोना प्रतिबंधात्मक नियोजनामुळे मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करण्यात आली नाही,परंतु ह्यावर्षी मंडळाने सांस्कृतिक, क्रीडा,प्रबोधनात्मक कार्यक्रम शासनाने दिलेल्या आदेशानुसार राबविण्याचे ठरवले आहे.सदर जयंती उत्सवासाठी यामध्ये अध्यक्ष विश्वजीत गव्हांदे,सचिव सचिन गाडेकर,उपाध्यक्ष भिमराव नितोने,सहसचिव विनय बनसोड,कोषाध्यक्ष अँड.विश्वंभर गवई,सहकोषाध्यक्ष बंटी गव्हांदे, संघटक सिध्दांत तायडे,सहसंघटक सचिन सुर्वे,सल्लागार धम्मा इंगळे,सहसल्लागार आशितोष निंबाळकर,आखाडाप्रमुख शुभम सुरडकर,सदस्य रत्नाकर सावदेकर,अजय सारसर,शुभम उमाळे यावेळी झालेल्या बैठकीत दिपक वानखडे,अजय गवई,सिध्दार्थ गवई,आनंद गंगावणे,सचिन तायडे,आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते,व आभारप्रदर्शन अतुल इंगळे यांनी केले.

Related posts

जिल्ह्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटला…

nirbhid swarajya

मुलानेच केला जन्मदात्याचा खुन

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 102 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 34 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!