खामगाव:-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चळवळीतील भूमिका १९२० ते १९४७ हा गंभीर विषय मांडताना डॉक्टर आंबेडकर यांच्या कार्याची त्यांच्या कर्तुत्वाची तुलना होऊ शकत नाही. येणारा काळ बहुजनांसाठी खूप भयावह आहे.” जर तुम्हाला सत्ता काबीज करायचे असेल तर संघर्ष करावा लागेल” असे उद्गार डॉक्टर ऋषिकेश कांबळे औरंगाबाद यांनी पत्रकार भवन येथे पार पडलेल्या प्रवीणजी पहुरकर यांच्या सत्कार प्रसंगी काढले .ते या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते प्रवीण पहुरकर साहित्यिक यांचा खामगाव नगरीतील नागरिकांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन अशोक भाऊ सोनवणे, डॉक्टर वसंत डोंगरे ,प्रवीण पहुरकर, सौभाग्यवती आशा पहुरकर ,ऋषिकेश कांबळे, प्राध्यापक डी. एस .वानखडे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर वसंत डोंगरे होते त्यांनी प्रवीण पहुरकर यांनी केलेल्या लिखाणाचा लेखाजोगा सादर केला .त्यांनी लिहिलेली पुस्तके ‘आंबेडकर चळवळ थांबली की संपली’? आत्मचरित्र पेबुळ ,माणूस काव्यसंग्रह व्यक्तीला विचार करायला लावणारे लिखाण आहे. म्हणूनच त्यांचा सत्कार करून त्यांच्या प्रतिभेला अधिक बलशाली बनवण्यासाठी आम्ही सन्मान करीत आहोत. डॉक्टर डोंगरे पुढे म्हणाले “आरक्षण हे तुम्हाला तुमचे कुटुंब चालवण्यासाठी मिळाले नसून आरक्षण हे चळवळ उभारण्यासाठी आहे” कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वंचित बहुजन आघाडीचे पार्लमेंटरी सदस्य तथा प्रदेशाध्यक्ष अशोक भाऊ सोनवणे यांनी सुद्धा प्रवीण पहुरकर यांच्या कार्याचा गौरव केला उपस्थितांना चेतावणी दिली की “शिका, संघटित व्हा,आणि संघर्ष करा” हा मूलमंत्र जोपर्यंत सत्यात उतरवत नाही तोपर्यंत या देशाची शासक तुम्ही बनू शकत नाही
previous post