मलकापुर : मलकापूर तालुक्यातील वाकोडी ग्रामपंचायत हद्दितील विविध नगरांमधील लाईट गेल्या तिन दिवसांपासुन सतत रात्री-बेरात्री जात असल्याने आज वाकोडी ग्रामपंचायतचे सदस्य गजानन ठोसर,दिपक गाढे,अशोक राजपुत,राहुल राजपुत,रविंद्र पाटील,निलेश आसटकर,शंकर पाटील आदि गावकऱ्यांनी कंपनी बिर्ला रोड कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले,व जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत आम्ही येथुन उठणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आंदोलनाची माहिती मिळताच उपकार्यकारी अभियंता शेगांवकर यांनी कार्यालयात येऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करुन तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत सुरू केला व या भागात नवीन डीपी व लोड डिव्हाईडेशन करून कायम स्वरुपी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.