शेगाव : महाराष्ट्रभर सुरू होत असलेल्या व कृष्ठरुग्ण व कृष्ठरुग्ण शोध मोहिमेत काल दिनांक 1 डिसेंबरला शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला सईबाई मोटे रुग्णालयात चे मेडिकल सुपरिटेंडेंट डॉ. प्रेमचंद्र पंडित तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण घोंगटे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शेगाव तालुका वरिष्ठ पर्यवेक्षक श्री अभिजीत सरदार व कृष्ठरोग विभागाचे श्री चोपडे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी डॉ. प्रवीण घोंगटे यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन करीत सांगितले की शेगाव तालुका अंतर्गत ७७ टीम शहरी व ग्रामीण भागात कार्यरत असून आरोग्य विभागाची टीम कार्यान्वित करण्यात आले आहेत. सदर तपासणी ही पूर्णपणे मोफत असून उपचारही मोफत करण्यात येणार असून सईबाई मोटे रुग्णालयाची व कुष्ठरोगाची टीम ही सज्ज असून रुग्णानी या मोहिमेचा फायदा घ्यावा असे डॉ.प्रेमचंद्र पंडित यांनी आवाहन केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यास नितीन व्यवहारे, सनांचे,चंदनशिव, उंबरकार ,जोशी यांचे सहकार्य लाभले.
previous post