८१ दात्यांनी केले रक्तदान
नांदुरा : कोरोनाच्या संकट काळात राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवू शकतो म्हणून संभाजी ब्रिगेड च्या वतीने संपूर्ण राज्यात ३१ मे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती ते ६ जुन शिवराज्याभिषेक सोहळा या कालावधीत महाराष्ट्र सरकारने केलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण महाराष्ट्रात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते .यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुक्याचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. विशेष म्हणजे या शिबिरात जिजाऊंच्या लेकींनी देखील मोठा सहभाग घेतला तसेच मुस्लिम युवकांनी देखील यामध्ये रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. या शिबिरास संभाजी ब्रिगेड चे जिल्हा सचिव शरद पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष मंगेश सोळंके तसेच संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुका व शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.