January 6, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा शेगांव सामाजिक

संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे ६ जून रोजी प्रस्थान

शेगाव– कोरोनाचे मळभ दूर झाल्याने यावर्षी पंढरपूर येथे आषाढी एकादशीचा सोहळा थाटात साजरा होणार असून श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावची दिंडी पंढरीस जाणार आहे . यावर्षी श्रींच्या पालखीचे ६ जून रोजी सकाळी ७ वा . मंदिरातून प्रस्थान होणार आहे . ७०० वारकऱ्यांसह श्रींची पालखी मार्गस्थ होणार आहे . श्रींचे पालखीचे पंढरपूर पायदळ वारीचे हे ५३ वे वर्ष असून श्रींची पालखी अकोला , वाडेगाव , पातूर , डव्हा , रिसोड , परभणी , परळी वैजनाथ , उस्मानाबाद , तुळजापूर , सोलापूर या मार्गाने एकूण ७५० किलोमिटर प्रवास करून आषाढ शु- ९ शुक्रवार ८ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे मुक्कामास पोहचेल .

श्रींची पालखी ८ जुलै पासून १२ जुलै पर्यंत श्री क्षेत्र पंढरपूर येथे मुक्कामास राहील .आषाढ शु . १५ बुधवार १३ जुलै रोजी सकाळी काला झाल्यानंतर श्रींची पालखी शेगावकरीता परतीच्या मार्गाने प्रस्थान करेल .अशी माहिती संत श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे

Related posts

खामगांव सामान्य रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन साजरा

nirbhid swarajya

हिंदुराष्ट्र सेनेच्या बुलढाणा युवा जिल्हाध्यक्ष पदी सागर बेटवाल…

nirbhid swarajya

अ.भा.मराठा महिला महासंघाची पहिली महिला जिल्हाध्यक्ष नियुक्त

nirbhid swarajya
error: Content is protected !!