बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल सह इतर ठिकाणी आज सकाळी वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस पडलाय .. यामुळे वातावरण आणखीनच थंड झालेय .. मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे .. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असून पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झालाय .. तर काही परिसरात धुके पडल्याने ही पिकांवर परिणाम झालाय .. हरभरा, गहू ही पीक पिवळी पडली असुन सुकलीय .. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय.. तर आज सकाळी पाऊस झाल्याने वातावरण आणखी थंड झाल्याने आणि ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर परिणाम होणार हे मात्र निश्चित ..