खामगाव : बालाजी मल्टपर्पझ फाउंडेशन खामगाव येथील सामाजिक वनीकरण प्रकल्प जणूना येथे वेगळ्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.वटपौर्णिमेला शहरी भागासह ग्रामीण भागातील महिला वडाची पुजा करून झाडाला दोरा गुडाळतात.जन्मोजन्मी असाच नवरा मिळावा यासाठी वडाची पुजा करतात…पण श्री बालाजी मल्टीपर्पझच्या अध्यक्षा अँड.मिरा बावसकर (माहुलिकर) यांच्या संकल्पनेतून वटपौर्णिमेला वट वृक्षांची दिवे,अगरबत्ती लावून पुजा न करता त्याच दिवशी एक वटवृक्षाचे झाड लावले व यापुढे वटपौर्णिमेला वटवृक्षाचे एक झाड लावण्याचा निश्चय केला.यापुढे महिलांनी वटपौर्णिमा ही वृक्षरोपण करूनच साजरी करावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी खामगाव येथील सामाजिक वनिकरणाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी घेवंदे मँडम,श्री.मल्टीपर्पज फाउंडेशन च्या अध्यक्ष अँड.मिरा बावस्कर (माहुलिकर),जणून येथील आशा वर्कर संजीवनी ताई शिरस्कार, राखी राजपूत, दिपाली कोळसे,सरिता शेजव,नसरिन पठाण,शोभा हरमकर,कविता गुरेकर,कल्पना गुरेकर,अनिता खंडेराव, आचल शेजव,इत्यादी महिला हजर होत्या.