खामगांव : दाळफैल वंजारीगल्ली भागात राहणाऱ्या एका इसमाचा शॉक लागून मृत्यु झाल्याची घटना काल दी.८ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दाळफैल वंजारीगल्ली भागात राहणारे संजय नामदेव ठाकरे वय ५५ हे त्यांच्या घरी आज दुपारी नळ आल्याने पाणी भरत असताना त्यांना इलेक्ट्रिक मोटरचा शॉक लागला.शॉक लागल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्या नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी त्यांना येथील सिल्वर सिटी हॉस्पिटल मध्ये नेले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. संजय ठाकरे हे स्थानिक पंचशील होमिओपॅथी महाविद्यालया मधे काम करत होते. त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर संपुर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
तर याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहे.