खामगाव : खामगाव तालुक्यातील शेलोडी येथे शेत शिवारातील घर फोडून सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना काल रात्री 12 वाजताच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर असे की महापालसिंग श्यामसिंग पवार हे आपल्या कुटूंबासमवेत घराच्या बाहेर झोपले होते हीच संधी साधून चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडून घरातील अलमारी तोडून त्यात असलेले सोन्या-चांदीच्या दागिन्यांनसह 40 हजार रुपयांची रोख असा एकूण 1 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे याप्रकरणी महापालसिंग श्यामसिंग पवार यांनी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध कलम 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोहेकॉ मनोहर कोल्हे करीत आहेत.Attachments area
previous post