खामगांव : अनिकट रोड भागातील रहिवासी सौ.अलका केशव बोराडे यांनी काल १० जुलै रोजी ग्रामीण पोलिस स्टेशनला तक्रार केली आहे. त्यामध्ये अशा आशयाचे नमूद करण्यात आले आहे की, निळेगाव शिवारामधील गट क्र. ५१ मध्ये १६२ आर. शेती असून शेतात कृषी विभागामार्फत शेततळे तयार करण्यात आले आहे. शेततळ्यात पाणी जिरून जाऊ नये म्हणून ५०० मायक्रॉन जाडीची प्लास्टीक पत्री (किं.२ लाख ३७ हजार रू.) आंथरली आहे. ९ जुलैच्या रात्री ९ वाजतापुर्वी अज्ञात चोरट्याने प्लास्टीक पन्नीमधून २५० चौ.फूट (किं.२२ हजार ७५० रू.) पन्नी कापून चोरून नेली. अशा आशयाच्या तक्रारीवरून अज्ञात चोरटया विरुध्द ग्रामीण पोलिसांनी भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेका सुनिल राऊत करीत आहेत.