बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भालेगाव येथे आज भाजीपाला उत्पादन करून त्याची विक्री करणाऱ्या शेतकर्यांना पिंपळगाव राजा पोलीसांनी जबर मारहाण करत अपमानास्पद वागणुक दिली आहे.
पोलीस एव्हढ्यावरच थांबले नाहीतर तर शेतकर्यांना मुर्गा करुन बराच वेळ उभे ही केले आहे. यावेळी घाबरलेले शेतकरी पोलिसांना विनवणी करत होते, मात्र पोलीस ऐकायला तयार नव्हते, या प्रकारामुळे मात्र शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरलीये. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी २४ तास भाजीपाला, दुध यासह जिवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी केली आहेत तर बुलडाणा प्रशासनाने सकाळी ८ ते १२ जिवनावश्यक वस्तूची विक्रीचे आदेश दिले असतांना ही आज पोलीसांकडुन भाजीपाला उत्पादक शेतकर्यांना मारहाण आणि अपमानास्पद वागणुक देण्यात आली आहे. अशा निर्दयी पोलीस कर्मचार्यांना तात्काळ निलंबित करन्याची मागणी शेतकऱ्यांसह शेतकरी नेत्यांनी केली आहे.
previous post