११ शेतकऱ्यांचे शेतीउपयोगी साहित्य जळून खाक
नांदुरा : बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वडी गावानजीक असलेल्या गोठ्याला भीषण आग लागली व दुपारची वेळ असल्याने हवा जोरात असल्याने आगीने रुद्ररूप धारण केले होते, या
आगीत जनावरांचा चारा, कुटारसह तसेच शेती उपयोगी लोखंडी गाडे, स्प्रिंकल, नांगर, वखर, धान्य आदी साहित्य जळून खाक झाले आहे, याभीषण आगीमध्ये ११ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वडी येथील नुकसान ग्रस्त शेतकरी विक्रम गोराडे, जनार्धन वाघ,रमेश विवोकार,समाधान बोडखे,गजानन वाघ,मोहन वाघ,परशुराम वाघ,अनिल वाघ या शेतकऱ्यांचा समावेश असून लाखो रूपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. आग विझविन्यासाठी नांदुरा व मलकापूर येथील अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे व सुदैवाने या आगीत कुठलीही जीवित हानी झाली नाही.