April 19, 2025
जिल्हा शेतकरी

शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये यासाठी खतांच्या किमती जाहीर करा – जि.प.कृषी अधिकारी

बुलडाणा : यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना रास्त भावाने खते मिळावीत, त्यांची फसवणूक होवू नये यासाठी खतांच्या प्रति बॅग किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. याच किंमतीला शेतकऱ्यांना खत विक्री करावी. तसेच शेतकऱ्यांनी याच किंमतीला खत खरेदी करावे. कुठलाही गैरप्रकार आढळल्यास नजिकच्या तालुका कृषि अधिकारी किंवा पंचायत समिती, कृषि अधिकारी यांना अवगत करावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाचे वतीने करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांची खरीप हंगामासाठी तयारी पूर्ण होत आली आहे तर मशागतीची कामेही अंतिम टप्यात आली आहेत यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना रास्त भावाने खते मिळावीत त्यांची फसवणूक होवू नये, कुठलाही गैरप्रकार आढळल्यास नजिकच्या तालुका कृषि अधिकारी किंवा पंचायत समिती,कृषि अधिकारी यांना अवगत करावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

खताचे कंपनीनुसार प्रती बॅग दर-

कंपनी जीएसएफसी : ग्रेड 20.20.0.13 – किंमत प्रति बॅग 975, ग्रेड 10.26.26 – प्रति बॅग 1175, ग्रेड 12.32.16 – प्रति बॅग 1185, डिएपी – प्रति बॅग 1200, कंपनी कोरोमंडल : ग्रेड डीएपी – 1250, ग्रेड 10.26.26- प्रति बॅग्‍ 1185, ग्रेड एमओपी – प्रति बॅग 950, ग्रेड 20.20.0.13- प्रति बॅग 1000, कंपनी स्मार्टटेक : ग्रेड 20.20.0.13- प्रति बॅग 1065, ग्रेड 10.26.26- प्रति बॅग 1295, कंपनी आयपीएल : ग्रेड डीएपी- प्रति बॅग 1225, ग्रेड एमओपी – प्रति बॅग 950, ग्रेड 16.16.16 – प्रति बॅग 1075, कंपनी आरसीएफ : ग्रेड युरीया – प्रति बॅग 266.50, ग्रेड 15.15.15- प्रति बॅग 1060, कंपनी इफको : ग्रेड 10.26.26 – प्रति बॅग 1200, ग्रेड 12.32.16- प्रति बॅग 1185, ग्रेड 20.20.0.13- प्रति बॅग 975 रुपये, कंपनी झुआरी : ग्रेड डिएपी – प्रति बॅग 1255 रूपये, कंपनी जीएनव्हीएफसी : ग्रेड 20.20.0- प्रति बॅग 950 अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

‘उमेद’ कायम ठेवण्यासाठी महिलांचा मूक मोर्चा

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 321 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 54 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

गुटखा पकडला ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

nirbhid swarajya
error: Content is protected !!