अकोला : संयुक्त किसान मोर्चा देशातील विविध भागात जाऊन किसान महापंचायत द्वारे कायद्याचा विरोध गावपातळीपर्यंत पोहोचविणे याकरिता प्रयत्न करत आहे.या प्रक्रियेतला भाग म्हणून संयुक्त किसान मोर्चा ची किसान कैफियत की महापंचायत २० फेब्रुवारी रोजी अकोल्यात शेतकरी नेते राकेश टिकैत व युद्धवीर सिंह यांच्या उपस्थितीत होणार आहे. शेतकरी जागर मंचने या महापंचायत चे आयोजन केले असून येथूनच सयुंक्त किसान मोर्चा आंदोलनाचे बिगुल फुंकले जाणार असल्याचे जागर मंचच्या वतीने सांगण्यात आले आहे. अकोला येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेतकरी जागर मंचच्या वतीने याबाबत माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील ही पहिलीच किसान महापंचायत आहे, केंद्र सरकार दडपशाहीच्या वर्गाने शेतकरी विरोधी कायदे शेतकऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे देशभरातील शेतकरी समाजासाठी मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. किसान कैफियत महापंचायतीचे आयोजन अकोल्यातील खुले नाट्यगृह येथे २० फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता करण्यात आले आहे. या सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान विकास मंच , कुणबी विकास मंडळ, नेहरू युवा परिवार, अमरावती विभागीय शिक्षक संघ, मराठा सेवा संघ, देशमुख समाज मंडळ, अखिल भारतीय मराठा महासंघ व इतर अनेक संघटनांचा आयोजन व नियोजनात सक्रीय सहभाग असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. राकेश टिकैत यांची अकोल्यातील सभा ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असल्याची यावेळी सांगण्यात आले.
previous post