शेगाव : जळगाव जामोद तालुक्यातील खेड येथील दिनकर रामभाऊ टाकसाळ हे शेगाव येथे राहणाऱ्या त्यांच्या बहिणीला आणायला शेगाव येथे गेले होते शेगाव येथे बस स्थानकावर सध्या दिवाळी सुट्ट्या निमित्त प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे अगदी चोरट्याने गर्दीचा फायदा उचलून, त्यांच्या खिशातून अज्ञात चोरट्याने नगदी २१ हजार रुपये चोरल्याची घटना ३० ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजे दरम्यान घडली.याप्रकरणी मंगेश दिनकर टाकसाळ यांनी शेगाव पोलीस चौकी मध्ये जाऊन पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून शेगाव पोलिसांनी आज 31 ऑक्टोंबर रोजी रात्री अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३७९ भादंवीन्वये गुन्हा नोंदविला आहे.तपास पोहेका मुरलीधर वानखडे हे करीत आहेत.