शेगाव : राना – वनात भटकंती करून पोटाची खळगी भरणाऱ्या धनगर समाजाला देण्यात आलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याने शेगावात धनगर समाज आक्रमक होऊन शासनाचा निषेध करण्यात आला आहे.राज्यात सुमारे अडीच ते तीन कोटी धनगर समाज अस्तित्त्वात आहे. डोंगरदऱ्यात राहणारे, भटकंती करुन उपजिवीका भागवणारे घनगर बांधव आजही विकासापासून वंचित आहेत. कित्येक पिढ्या ही मागासलेपणाची झळ सोसत आहेत. भारतीय राज्यघटनेने धनगर समाजाला एसटी प्रवर्गात स्थान दिलंय. मात्र, गेल्या ७० वर्षांमध्ये सर्वच सरकारांनी आरक्षण अंमलबजावणीपासून फारकत घेतली. आज तुमच्या हाती धनगर उद्धाराची संधी आहे.धनगर समाजाने राज्यातील विविध ठिकाणी आमरण उपोषण केले.जिल्हयांपासून ते गाव खेड्यांपर्यंत आंदोलनाचे लोण परसले होते. या अनुशंगाने आपण एक बैठक घेतली.
या बैठकीत मी धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठीचे पुरावे मांडले मात्र अद्यापही आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही त्यामुळे तात्काळ अंमलबजावणी करावी. मेंढपाळांसाठी घोषित केलेल्या दहा हजार कोटींच्या सहकारी महामंडळाचे जिल्हास्तरीय संस्था स्थापन झाल्या असून लवकरात लवकर सहकार महामंडळाची घोषणा करून योजना कार्यान्वित करण्यात यावी व तसेच स्वतंत्र अध्यक्षाची नेमणुक करणे.‘जे आदिवासींना ते धनगरांना’ याप्रमाणे घोषित केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या २२ योजनांपैकी काही योजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या नाहीत व संपूर्ण निधी सुद्धा उपलब्ध झाला नाही तो उपलब्ध करून देण्यात यावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.याप्रसंगी धनगर समाज महासंघ जिल्हाध्यक्ष मनोहर पाचपोर, जिल्हा सचिव अमर बोरसे, पुंडलिक भिवटे, शिवा गुरव, सोपान कळंबे, सुयोग जुमळे, अनंता बोरसे, प्रवीण, सुरोसे, गणेश फासे, गजानन दिवनाले, गोपाल मोहे, ऍंड. निवृत्ती बोरसे, एकनाथ बोरसे, अंबादास भारसाकळे, निलेश घोंगे, दत्ता बोरसे, पुरुषोत्तम भारसाकळे, मोहन खोंदिल, प्रकाश पाचपोहे यासह समाज बांधव उपस्थित होते.
previous post