April 19, 2025
शेगांव

विहिरीत पडलेल्या महिलेचे पोलिसांनी वाचविले प्राण

शेगाव : शेतातील विहिरीमध्ये पडलेल्या एका 48 वर्षीय महिलेचे प्राण पोलिसांनी वाचविले असून सदर महिलेसाठी पोलीस देवदूत बनले असल्याची घटना ३ जून रोजी दुपारी १ वाजता च्या सुमारास खोलखेड शिवारात घडली. खोलखेड शिवारात असलेल्या ईश्वरसिंग राजपूत यांच्या शेतातील विहिरीमध्ये एक महिला पडली आहे अशी माहिती दुपारी गस्तीवर असतांना ठाणेदार इंगळे यांना मिळताच ठाणेदार यांनी क्षणाचाही विलंब न लावता कार्यतत्परता दाखवत पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले व जवळपास ६० फूट खोल असलेल्या विहिरीत ज्ञान नर्मदा ज्ञानदेव रणसिंगे वय 48 ही महिला विहिरीमध्ये पडलेली दिसली या महिलेला पोलिसांनी बाहेर काढण्यासाठी गोतखोर यांना बोलावले व पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी व गोतखोर यांनी मिळून त्या महिलेल बाहेर काढण्यासाठी अथक परिश्रम घेऊन सदर महिलेचे प्राण वाचविले.

घरातील किरकोळ वादावरून रागाच्या घरांमध्ये सदर महिलेने विहिरीत आत्महत्या करण्याच्या उद्देशाने उडी मारली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Related posts

आ.ॲड.आकाश फुंडकर यांनी केली रेल्वे क्राँसींगवर उडडाण पुलाचे बांधकामाचा पाहणी

nirbhid swarajya

आ.आकाश फुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त रंगला खेळ पैठणीचा व नारी सक्तीचा सन्मान

nirbhid swarajya

चाँद दिसला; ‘रमजान’चे उपवास सुरू

nirbhid swarajya
error: Content is protected !!