खामगांव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विवाह सेवा संघर्ष समितीचे व्यवसायिक बंधन वर उपासमारीची वेळ आली आहे.विवाह संघ सेवा संघर्ष समितीच्या वतीने आज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात विवाह सेवा संघर्ष समितीच्या माध्यमातून विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. विवाह सेवा संघर्ष समितीतिने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की,नवरात्री व जगदंबा उत्सवा करता परवानगी मिळणे बाबत तसेच लग्न सोहळा व स्वागत समारोह, वाढदिवस तसेच इतर धार्मिक कार्यक्रमात जागेच्या क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेची पर्यायी व्यवस्था यांची परवानगी मिळण्याची मागणी सुद्धा संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे मंदिर, धार्मिक स्थळे,विज बिल,नगरपालिकेचा कर भरणा यामध्येसुद्धा सूट द्यावी अशी मागणीसुद्धा समितीच्या वतीने या निवेदनातून करण्यात आली. आहे सर निवेदनावर मंडप डेकोरेशन असोसिएशन, खामगाव तालुका फोटोग्राफर असोसिएशन, डीजे असोसिएशन, केटरिंग असोसिएशन, यांच्या सुद्धा सह्या आहेत.