नागपूर : राज्यातील अनेक शिक्षक विनामानधन सेवा देत आहेत शासन कधीतरी संस्थेला अनुदान देईल आणि आमचे वेतन सुरू होईल या प्रतीक्षेत शिक्षकांनी शिक्षण संस्थांमध्ये पंधरा ते वीस वर्षे काढली आहेत नियमित शाळेत शिकविणे बरोबरच शिक्षक घरातील कुटुंबियांचे पोट भरण्यासाठी रोज मजुरी, मिळेल ते काम करीत उदरनिर्वाह चालवीत होते. परंतु कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन केले व ते अजूनही कायमच आहे त्यामुळे इतरांसारखे शिक्षकांची रोजगार हिरावल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. शाळा, विद्यालयात शिकवणारे शिक्षक सुनील पेंदोर, राजेंद्र तीनखेडे, विशाल राठोड, दिलीप तिरपुडे असे अनेक शिक्षक आहे जे हॉटेलमध्ये दुकानांमध्ये कॅटरिंगचे कामाला जाऊन कुटुंबाची गुजराण करीत आहेत, कोणी सिक्युरिटी गार्ड तर कोणी छोटा मोठा रोजगार करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात.
२००९ मध्ये शासनाने कायम विनाअनुदानित यातून कायम हा शब्द काढून २०१४ मध्ये २० टक्के अनुदानावर काही शाळा आणल्या तर त्यांना अनुदान दिले नाही तसेच अनुदानित शाळांमध्ये शासनाने विनाअनुदानीत नैसर्गिक वाढीव तुकड्या दिल्या होत्या शासनाने त्यांना चौथ्या वर्षी अनुदान मिळेल असा शासन निर्णय निर्गमित केला होता २०१२ पासून अनुदान दिले नाही राज्यात जवळपास २५ हजारांवर शिक्षक अध्यापणा बरोबरच अन्य काही काम करून कुटुंबीयांची गरज भागवित आहेत.
आम्ही सर्व शिक्षक पंधरा ते वीस वर्षांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहोत मानधन मिळत नसले तरी कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी वाटेल ते काम करून त्यांचे पोट भरतो आहे पण सध्याच्या बिकट अवस्था झाली आहे स्वाभिमानी असल्याने इतरांकडे हात पसरला हे अवघड जात आहे अशा वेळी शासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे – चेतन चव्हाण ( विभागीय अध्यक्ष शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ)