नांदुरा : तालुक्यातील पोटळी येथील शेतकरी विनोद लांडगे हे दुपारी ३.५० वाजता आपल्या शेतातून बैलजोडीने घराकडे जात असताना केदार नदीमध्ये अचानक शॉर्टसर्किटमुळे विद्युत तार तुटल्यामुळे बंडी चा एक अंदाजे किंमत 70 हजार जागीच ठार झाला व बैलबंडी ला बांधलेली गाय अंदाजे किंमत ५० हजार ही जागीच ठार झाली व बैलबंडी मधील त्यांचा मुलगा अभिषेक तांगडे, व गौरव दिलीप तांगडे ह्याना विद्युत तारेचा हलका झटका बसला.
दुर्दैवी कुठलीही जीवितहानी झाली नाही.विद्युत महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे हा प्रकार घडून आला आहे असे चित्र या ठिकाणी दिसून आले आहे. घटनेची माहिती मिळताच याठिकाणी तहसील कार्यालयाचे कर्मचारी,मंडळ अधिकारी बंगाले, तलाठी सोनवणे यांनी पाहणी करुन व पंचनामा करून पुढील कारवाईची केली आहे.तसेच महावितरणाच्या गलथन कारभारामुळे सदर प्रकार घडला असून याची चौकशी करुन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी विनोद तांगडे यांनी केली आहे.