खामगाव : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडॉऊन च्या काळात कोरोना विषयी जनजागृती व्हावी या साठी खामगाव येथील गो.से. महाविद्यालया कडून ऑनलाईन रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज दिनांक १७ एप्रिल,२०२० रोजी गो.से महाविद्यालया कडून विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष स्व. बाबासाहेब शंकरराव बोबडे यांच्या जयंतीनिमित्त कोरोना या रोगाबदल आपल्या घरासमोर परिसरामध्ये किंवा इतर ठिकाणी सोशल डीस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ऑनलाईन रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये कु. वैष्णवी महादेव गोरले (Bsc – १ वर्ष) या विद्यार्थिनीने कोरोना आजारा बद्दल जागृती करत अतिशय उत्कृष्ट रांगोळी काढून कोरोना पासून वाचण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याची माहिती दिली. या रांगोळी मधे तिने सेनिटाईझर चा वापर करून हात स्वच्छ करावे, मास्क चा वापर करावा, घरी रहा सुरक्षित रहा, सोशल डिस्टन्ससिंग पाळावी आणि विशेष म्हणजे आपल्या देशातील सर्व डॉक्टर्स देशाला कोरोणापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत असे विविध संदेश कु. वैष्णवी महादेव गोरले या विद्यार्थिनीने आपल्या रांगोळी मधून दिले आहेत. https://twitter.com/NirbhidS/ status/1251163140718342144?s=19 |
previous post