शेगाव : तालुक्यातील वरुड येथील युवक शेतकरी धिरज राजकुमार गोळे वय 21 वर्ष याचा कपाशीवर औषधाची फवारणी करताना विषबाधा होऊन मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेगाव तालुक्यातील वरुड गव्हाण येथील युवा शेतकरी धीरजकुमार गोळे व 21 हा आपल्या शेतात कपाशी वरती मोनोसील अवार्ड औषधाची फवारणी करत होता.फवारणी करत असताना त्याला औषध त्याच्या अंगावर व तोंडावर उडाले होते. शेतातील लोकांनी तात्काळ त्याला शेगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती केले होते.त्याची तब्येत जास्त खराब झाल्याने त्याला अकोला येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये भरती केले होते.मात्र दहा दिवसानंतर त्याची प्राणज्योत मावळली.धीरज या गावातील एक आदर्श मुलगा होता त्याचे इंडियन आर्मी मध्ये रुजू होण्याचे स्वप्न होते काही महिन्यांपूर्वीच त्यांनी इंडियन आर्मीचे फिजिकल मेडिकल पास केले होते.परंतु इंडियन आर्मी मध्ये रुजू होण्याच्या पहिलेच तो जग सोडून गेला.त्याच्या जाण्याने मित्रपरिवार कुटुंबा व संपुर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
previous post
next post