खामगांव : कोरोना महामारीत गगनास भिडलेल्या महागाईचा तीव्र निषेध करुन उपविभागीय अधिकारी जाधव यांना निवेदन देऊन वंचितच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. वंचितने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपण सर्वजण भुतो न भविष्यती अशी महागाईची झळ झेलत आहोत व कोरोना काळातील जीवघेणी अवस्था चालु असतांना आता त्यात महागाईची समस्या भोगत आहोत व जगलेत त्याचे जीवन असाह्य केले आहे. वैद्यकीय खर्चात आपली या महामारीत आर्थिक लुट झालीच आहे व आता स्वस्त किंमतीत जीवनावश्यक वस्तु पुरविणे तर दुरच राहो पण त्याचे भाव कडाडले आहेत.
या महामारीत पोषक आहार घेवून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याऐवजी उपासमारीची वेळ आली आहे. काही युवकांच्या होत्या त्या नोकऱ्याही गेलेल्या आहेत. संचारबंदीचे नियम पाळून धंदा, उद्योगही करता येत नाही. म्हणून झोपीचे सोंग घेतलेल्या निर्दयी शासनाला जागी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा व त्यामुळे वाढलेल्या महागाईचा तीव्र निषेध करीत आहे.आमच्या मागण्या खालील प्रमाणे केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस चे वाढलेले असल्याने सदर दर कमी करण्यात यावे.जीवनावश्यक वस्तु खाद्य तेल, किराणा सामान यांचे वाढलेले भाव तात्काळ कमी करण्यात यावे. प्रधानमंत्री पिक विम्याचा शेतकऱ्यांना पाहिजेत्या त्या नुकसान भरपाईच्या प्रमाणात लाभ मिळत नसल्याने विमा कंपनीकडून १०० टक्के लाभ नुकसान ग्रस्त शेतकन्यांना मिळावा. वारकन्यांना पंढरपूरची आषाढी पायी वारी करण्याची परवानगी देण्यात यावी.
जुने थकीत कर्जदार शेतकन्यांना दोन लाखावरील संपुर्ण शेतकन्यांना कर्जमाफी देण्यात यावी. लोखंडा, पाळा, गणेशपुर, चिंचपूर, वैरागड परिसरात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याबाबत तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. या व इतर मागण्या शासनाने तात्काळ पुर्ण कराव्यात अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल मग त्यापासून होणाऱ्या परिणामास सर्वोतोपरी शासन जबाबदार राहिल. असा इशाराही वंचित कदून देण्यात आला आहे. राज्य उपाध्यक्ष शरद वसतकार, जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे, महिला जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंग, नगरसेवक विजय वानखडे, प्रभाकर वरखेडे, नरेंद्र तायडे, गौतम सुरवाडे यांच्यासह आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.