खामगांव : 23 मार्च पासून संपूर्ण देशभरामध्ये लॉकडाऊन लागला आणि प्रत्येक जण आपल्या घरी बंदिस्त झाले. या कोरोनाच्या काळामध्ये एकीकडे पोलीस प्रशासन,डॉक्टर,नर्स,सफाई कर्मचारी, आदी आपल्या जीवाची परवा न करता कोरोना बाधित रुग्णांना वाचवण्याचे प्रयत्न करत होते.तर एकीकडे कोरोनाच्या भीतीमुळे सामान्य माणूस घरामध्ये थांबलेला होता.या कोरोनामध्ये घरी असलेल्या नी विविध छंद जोपासले.कोणी आपल्या परिवाराला वेळ दिला तर कोणी स्वयंपाक करणे, नवनवीन प्रयोग करून पाहणे,घराची साफसफाई असे सुद्धा केले. काही लोकांना तर फोटोग्राफीची आवड असल्याने त्यांनी आपल्या परिवाराचे व घराच्या गच्चीवरून दिसणार्या नैसर्गिक सौंदर्याचे व शांततेचे छायाचित्रण सुद्धा केले. या सर्वांमध्ये असाच एक किस्सा आमचे मित्र मंगेश डोंगरे त्यांच्यासोबत घडला नेहमीप्रमाणे लॉकडाऊन मध्ये वर्क फ्रॉम होम करीत होते. नेहमीप्रमाणे त्यांच्या आईने घरातील सर्व कामे आटपून कपडे धुतले व त्यांचे काही कपडे जीन्स व शर्ट गॅलरीतील दोरीवर टाकले होते. त्या जीन्सवर साऊथ आफ्रिका मधे आढळणारा मोकिंग क्लीप चाट बर्ड हा पक्षी त्या जीन्स वर रोज येऊन बसत होता व तासनतास तिथेच बसून राहत असे. काही दिवसांनी त्यांच्या लक्षात आले मागील ३ ते ४ महिन्यांपासून हा पक्षी त्यांचे येथे दररोज येत असून रात्री हा पक्षी गॅलरी मधील जीन्सच्या खिशाजवळ झोपतो. एक दिवस त्यांनी त्या पक्षावर पूर्ण लक्ष देण्याचे ठरवले. त्यांनी संपुर्ण लक्ष दिले सुद्धा.. त्या वेळी त्यांच्या असे लक्षात आले की त्याला जिन्स वर बसायला कम्फर्ट झोन होता.कम्फर्ट झोन प्रत्येकाच्या लाईफ मध्ये कधी ना कधी येतोच तो पक्षी असो किंवा माणुस… ती जागा आणि त्या सर्व त्यांचा सहवास मनात रमून जातो. मोकिंग क्लिप चार्ट हा पक्षी नर असून दिसायला सुंदर असून हा पक्षी आवाज पण छान काढतो.विशेष म्हणजे ३ ते ४ महिन्यापासून येणारा या पक्षाने जीन्सवर कुठल्याही प्रकारची घाण केली नाही.दररोज येणाऱ्या या पक्षाला बघितल्या शिवाय मंगेश ला सुद्धा करमत नव्हते. रोज बघायची त्यांना त्याची सवय झाली होती. मंगेश यांना आधी वाटले की तो घरटे बांधिल पण त्याने तिथे घरटे वगैरे ,मात्र त्या पक्षाने काहीच बांधले नाही. एक दिवस त्यांनी गॅलरी मधून मुद्दाम जीन्स काढला व त्या पक्षाची येण्याची वाट बघितली मात्र तो पक्षी दिवसभर त्याठिकाणी आलाच नाही.रात्रीसुद्धा झोपेतून जाग आल्यावर त्यांनी गॅलरी चेक केली असता रात्रीसुद्धा तो पक्षी त्या ठिकाणी आला नव्हता. तो पक्षी न आल्याने मंगेश यांचे मन लागत नव्हते मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी लगेच त्या गॅलरी मधील दोरी वरती आपली जीन्स नेऊन ठेवली जीन्स ठेवल्यावर तो पक्षी तासाभरातच त्या जीन्सवर येऊन बसला व आता रोज रात्री इथे झोपायला सुद्धा येतो. मंगेश डोंगरे यांना पक्षांची फोटोग्राफी करण्याचा छंद आहे त्यामुळे त्यांनी त्या पक्षाचे विविध फोटो सुद्धा काढले आहेत.लॉकडाऊन मधे घडलेला हा किस्सा नक्कीच यांच्या लक्षात राहणारा आहे असे मंगेश डोंगरे यांनी सांगितले.
previous post
next post