खामगांव : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर असलेल्या संचारबंदीच्या कालावधीत देखील खामगांव येथे उमेश जोशी यांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
दिनांक २ मे रोजी रात्री ९ वाजता दरम्यान डॉ शीतल चव्हाण यांचे पती भावेश चव्हाण हे हॉस्पिटलमधून मोटार सायकल ने घरी जात असतांना देशमुख मंगल कार्यालय जवळ त्यांच्या खिशातून पर्स पडले होते. तेंव्हा त्याच भागात राहणारे फार्मसी मध्ये मॅनेजर म्हणून नोकरी करणारे उमेश जोशी हे घराबाहेर बाहेर आले असता त्यांना देशमुख मंगल कार्यालय जवळ पर्स दिसून आले. त्यांनी ते पर्स उघडून पाहिले असता त्या मध्ये काही रक्कम व कार्ड पाहून त्यावर त्यांनी साधून सांगितले की अश्या ठिकाणी पर्स मिळून आलं तुम्ही त्याची खात्री करून माझ्याकडून परत घेऊन जा. त्यानंतर भावेश चव्हाण त्या ठिकाणी पोहोचले असता उमेश जोशी यांनी त्यांना त्यांचे पर्स परत दिले. त्यांच्या पर्स मध्ये ३३ हजार रु नगदी व एटीएम कार्ड व इतर साहित्य होते.
यावेळी भावेश चव्हाण यांनी उमेश जोशी यांचे आभार मानले तसेच त्यानां भेट वस्तू देऊन सत्कार करू असे देखील सांगितले. लॉकडाऊन च्या काळात सुध्धा भावेश चव्हाण यांचे पर्स परत करून उमेश जोशी यांनी माणुसकी चे दर्शन घडविले आहे.