मुंबई : रेल्वेच्या कुठल्याही समस्येसाठी रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे हेल्पलाईन क्रमांक एकत्र केले आहेत. भारतीय रेल्वेने उपलब्ध सर्व हेल्पलाईन क्रमांकांऐवजी आता 139 क्रमांक जारी केला आहे. यामुळे प्रवाशांना हा क्रमांक लक्षात ठेवणं आणि रेल्वेशी संपर्क करणं अधिक सोपं होणार आहे. 139 या हेल्पलाइन क्रमांकावर आता प्रवाशांना सर्व माहिती मिळवता येणार आहे व तक्रार करता येणार आहे. विभागीय रेल्वे मंडळंही 139 क्रमांकाशिवाय दुसरा कुठला हेल्पलाईन क्रमांक आता जारी करणार नाहीत. नवीन क्रमांक हा रेल्वेच्या सुविधांचा उपयोग करणाऱ्या एकीकृत सेवा देईल. सेवा, सुरक्षा, तक्रार, खाद्यपदार्थ आणि सतर्कतेसाठी आता 139 क्रमांक डायल करता येईल. हा क्रमांक सुरू होताच आधीचे सर्व हेल्पलाईन क्रमांक बंद केले जातील. 139 हा हेल्पलाइन क्रमांक वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध करून दिला जाईल आणि हा आयव्हीआरएस ( इंटरॲक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टम ) आधारित आहे. या क्रमांकावर प्रवासी, ट्रेन संबंधित सखोल माहिती आणि पीएनआर स्थिती, तिकीट (सामान्य आणि तत्काळ ) उपलब्धता, ट्रेन येण्याची वेळ, निघण्याची वेळ, प्रवासाची वेळ जाणून घेण्याच्या वेळेसोबतच आरक्षणासंबंधीची माहिती ही एसएमएसद्वारे मिळवता येईल.
previous post