खामगाव : येथील हॉटेल देवेंद्र मधे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय मध्ये आज मस्तान चौक भागातील २१ युवकांनी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऍड नाझेर काझी व खामगाव शहराध्यक्ष तथा नगरसेवक देवेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला.

या प्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख व बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाअध्यक्ष ऍड नाझेर काझी यांनी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा उपस्थिती दर्शवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सेक्युलर विचारांचा पक्ष असून युवकांना सन्मानाने स्थान देणारा पक्ष आहे असे प्रतिपादन केले. संघटनेबद्दल मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या सदर प्रवेश सोहळा मध्ये मस्तान चौक भागातील युवा नेतृत्व नाजिम खान पटेल व त्यांचे सहकारी फैजान खान, मोहम्मद जैद, मोहम्मद ओवेस, मोहम्मद आरिफ, नदीम मंसुरी, सय्यद नईम, मोहम्मद उमेर, अकबर खाटीक, वसीम खान, शेख मुस्ताकिम चकला, शेख सलमान खान, सलीम खान, जमील खान, राशिद मंसूरी, मोहम्मद अकबर,

शेख अफसर,शेख जाफर, इम्रान खान, शेख अश्पाक या युवकांना देवेंद्र देशमुख यांनी हार व पक्षाचा दुपट्टा घालून पक्ष्यांमध्ये स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विकास चव्हाण, युवक शहर अध्यक्ष आकाश खरपाडे, तालुका युवक अध्यक्ष भगवान लाहुडकार, माजी नगरसेवक अमोल बिचारे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष सय्यद मोहीयोद्दिन, मोहम्मद आरिफ भाई, शहर संघटक मिर्झा अक्रम बेग, लक्ष्मणराव देशमुख, योगेश चोपडे, यांची उपस्थिती होती.