खामगाव : भाजयुमो शहर अध्यक्ष तथा रुग्ण कल्याण समितीचे सदस्य राम मिश्रा यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. सर्वप्रथम राम मिश्रा यांनी आपले आधारस्तंभ लोकनेते स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
त्यानंतर वाढदिवसानिमित्त सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले यावेळी निवासी वैद्यकीय अधीक्षक डॉ.निलेश टापरे भाजपा जिल्हा सचिव व रुग्ण कल्याण समिती सदस्य संजय शिंनगारे, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, नगरसेवक राकेश राणा, नगेन्द्र रोहणकार, विनोद टिकार, पवन गरड, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर राम मिश्रा यांच्या शुभहस्ते नागरिकांना मोफत वृक्ष वाटप करण्यात आले. तसेच सायंकाळी सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण व मिठाईचे वाटप करण्यात आले आहे.