जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत विधी पहुरकर अव्वल
खामगाव – येथील वामन नगर भागात राहणारी विधि संजय पहुरकर हिने बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये दुहेरी प्रकारात प्रथम पारितोषिक पटकाविले असून राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली.या स्पर्धेत 19 वर्षाच्या आतील वयोगटात विधी पहुरकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने नुकतीच खामगाव येथील गो.से. महाविद्यालय येथे असणाऱ्या इनडोअर स्टेडियम मध्ये बॅडमिंटन स्पर्धा पार पडली.या स्पर्धेत जिल्हास्तरीय अनेक खेळाडू सहभागी झाले होते. या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये १९ वर्षाच्या आतील वयोगटातील खेळाडूंच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून तिची राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी सुद्धा निवड झाली आहे. यापूर्वी विधीने अनेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.विशेष म्हणजे विधी पहुरकरने परीक्षा सुरू असतानाही काही दिवसाच्या सरावाच्या जोरावर या स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले.त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विधीने वयाच्या १३ व्या वर्षी खेळायला सुरुवात केली .विधी सध्या खामगाव येथील पारिजा स्पोर्ट्स क्लब मध्ये बॅडमिंटन चे प्रशिक्षण घेत असून आजपर्यंत तिने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.विधी सायना नेहवाल व पी व्ही सिंधू यांना आपला आदर्श मानते आणि यापुढे असाच उत्कृष्ट खेळ करत देशाचे प्रतिनिधित्व करायचे तिचे मुख्य ध्येय आहे. विधी पहुरकर हिने प्रथम पारितोषिक पटकावल्या बद्दल तसेच राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.विधी पहुरकर ही जलंब येथे पोलीस विभागात कार्यरत असलेल्या पोहेका संजय पहुरकर यांची मुलगी आहे.संजय पहुरकर सुद्धा उत्कृष्ट कबड्डीपटू आहे.त्यांनी अनेक विभागस्तरीय कबड्डीच्या सामने खेळले आहे.विधी आपल्या यशाचे श्रेय आपले गुरु व आई-वडिलांना देते