काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची प्रमुख उपस्थिती
खामगाव – येथील कुणबी समाज विकास मंडळाच्या वतीने कुणबी समाज वधु – वर परिचय मेळावा व सोयरिक पुस्तिकेचे प्रकाशन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले आहे.गेल्या १९ वर्षापासून सामाजिक उपवर युवक, युवतीचा परिचय मेळावा व सोयरिक पुस्तिकेचे प्रकाशन संत शिरोमणी तुकाराम महाराज कुणबी समाज मंडळाच्या वतीने करण्यात येते. यंदाही हा कार्यक्रम नांदुरा रोडवरील संत तुकाराम महाराज सभागृहात रविवार दि.२६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मलकापूर विधान सभा मतदार संघाचे आमदार राजेश एकडे राहणार असून सोयरिक पुस्तीकेचे प्रकाशन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात येईल. या कार्यक्रमाला राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.डॉ.राजेंद्र शिंगणे व सर्व आमदार, जिल्ह्यातील जेष्ठ नेते यांची उपस्थिती राहील. तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष राजाराम काळणे व सदस्यांनी केले आहे.