खामगाव : भाजप सरकारने निवडणुकांवेळी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करावी व बेरोजगार युवकांना रोजगार द्यावा या मागणीसाठी “रोजगार दो” महाअभियान युवक काँग्रेसच्या वतीने सुरु केले आहे. पहिल्या टप्यात विदर्भात सुरु असलेल्या महाअभियान रॅलीचे आज बुलडाण्याला जात असताना खामगाव येथील काँग्रेस पक्षाचे विदर्भ समन्वयक धनंजय देशमुख यांच्या घरी कुणाल राऊत व युवक काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी खामगांव युवक कॉग्रेस पदाधीकाऱ्याच्या वतिने कुणाल राउत यांचा शाल श्रीफळ व पुष्प गुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी युवक कॉंग्रेस महाराष्ट्र प्रभारी विजयसिंह राजपूत, युवक कॉग्रसचे प्रदेश जनरल सेक्रेटरी अजित सिंग यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला. यावेळी जसवंतसिंग सिख, स्वप्नील ठाकरे, मयुर हुरसाळ, मंगेश इंगळे, रोहितसिंग राजपुत, अनुप गलांडे, सागर राखोंडे, सचिन गवळी, आर.एम. देशमुख, नितीन गावंडे आदिची उपस्थिती होती.