January 1, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई सामाजिक

युवकांनी वाचवले विहिरीत पडलेल्या दीड वर्षाच्या चिमुकल्याचे प्राण

खामगांव : असे म्हटल्या जाते की, ” देव तारी त्याला कोण मारी ” आणि असाच काही प्रत्यय येथील अनिकट रोड वरील सुटाळा खु. मधे आला आहे. अनिकट रोड वरील विहिरित दिड वर्षाचा मुलगा पडला होता. त्याच्या आईच्या लक्षात येताच आरड़ा ओरड केल्याने तिथे बाजूला असलेल्या दोन युवकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता विहिरित उतरून त्या चिमुकल्याचे प्राण वाचवले आहेत. मिळालेल्या महितीनुसार सुटाळा खुर्द भागातील अनिकट रोडवरिल प्रकाश बोंबटकार हे सकाळी नेहमी प्रमाणे त्यांच्या कामाला गेले होते. सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास घरी पत्नी व दीड वर्षाचा मुलगा हे दोघे होते. मुलगा समर्थ प्रकाश बोंबटकार हा शेजारी असलेल्या बळीराम कवठाळे अंगणात खेळत असताना समर्थ हा अंगणात असलेल्या विहिरिजवळ गेला. विहिरिच्या कठडयावर गेला असता त्याचा तोल जाऊन विहिरित पडला.

यावेळी आईच्या लक्षात येताच आईने आरडा ओरड केल्यावर शेजारी असलेल्या सचिन गावंडे व नंदकिशोर अत्तरकार या दोन युवकांनी तात्काळ विहिरिजवळ जाऊन पाहिले असता चिमुकला समर्थ त्यांना विहिरित पडलेला दिसला. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अरूंद अश्या ५० फुट विहिरित उतरुन चिमुकला समर्थ याला बाहेर काढले. समर्थला विहिरीतून बाहेर काढल्या नंतर त्याच्या पोटात पाणी गेल्याने त्याच्या पोटातील पाणी काढले. त्यानंतर त्याला तात्काळ उपचारासाठी येथील खाजगी हॉस्पिटल मधे दाखल केले असुन त्याची प्रकृति आता धोक्याबाहेर आहे. चिमुकला समर्थचे प्राण वाचल्यामुळे त्याच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तर सचिन गावंडे आणि नंदकिशोर अत्तरकार यांनी मोठ्या धाडसाने चिमुकल्या समर्थचा जीव वाचल्याने दोघांचे परिसरात कौतुक होत आहे. तर समर्थच्या आई व वडिलांनी सुद्धा या दोघांचे आभार मानले आहे. यावेळी भावसार सर, प्रा. पाटील सर, विनोद कळसकर, अक्षय पाटील, सागर टिकार यांचे सहकार्य लाभले.

Related posts

डॉ नितीश अग्रवाल आता प्रत्येक शनिवारी आयकॉन होस्पिटल अकोला येथे सेवा देणार

nirbhid swarajya

जिजाऊ जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाकडून सुटी जाहीर….

nirbhid swarajya

बोरजवळा ग्रामसेवा सहकारी संस्थेवर ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व

nirbhid swarajya
error: Content is protected !!