मुख्याधिकारी यांचे टॉवर वाल्यानां अभय
खामगाव: येथील शिवाजी वेस कालिंका माता मंदिर परिसरातील मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहे. टॉवर उभारताना अवैध जनरेटर देखील बसविण्यात आले असून, हे टॉवर तात्काळ बंद करण्याची मागणी शिवाजी वेस भागातील नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात सोमवारी परिसरातील मातृशक्तीसह नागरिकांनी पालिकेत धडक देत, मुख्याधिकाऱ्यांकडे संतप्त भावना व्यक्त केल्या.कालिंका माता मंदिर परिसरात एका मोबाईल कंपनीचे टॉवर बसविण्यात आले. या टॉवरसाठी लागणाऱ्यां जनरेटरसाठी अवैधरित्या सर्व्हीस लाइन जोडण्यात आली आहे. मे २०१९ पासून या टॉवरमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. हे टॉवर तात्काळ बंद करण्याची मागणी आनंद थानवी, पंकज शर्मा, दुर्गा सुर्वे, मधुकर सुर्वे, उर्मिला थोरात, दामोदर थोरात, रमेश बावने, उर्मिला बावने, नितीन सुर्वे, शिवाणी गोळे, भारती थानवी, वैशाली जोशी, कल्पना इंगळे, जया श्रीनाथ, संतोष ठाकरे, रामचंद्र टाक, ज्ञानदेव थानवी, सागर हेलोडे, अनूप मोहता आदींनी केली आहे.