खामगाव:शहरातील रामेश्वरानंद नगर मधील रामेश्वर घोराळे यांच्या निवासस्थानी मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा च्या वतीने ८ जून रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिराचे उद्घाटन लोकतंत्र सेनानी संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रामेश्वर घोराळे यांच्या हस्ते करण्यात आले.शिबिरामध्ये जवळपास १२० रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य तो उपचार घेण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी वैभव निळे,जनसंपर्क अधिकारी मोहनराव नारायणा नेत्रालय, डॉ.ॠषिकेश पाटील नेत्रतज्ञ,सुरेंद्र तोमर तंत्रज्ञ,विनोद अमलकार, संतोष वावगे उपस्थित होते.शिबिराच्या यशस्वितेसाठी गणेश घोराळे, संदिप घोराळे, सचिन घोराळे, मनिषा घोराळे यांनी परिश्रम घेतले.