April 11, 2025
जिल्हा बातम्या बुलडाणा मेहकर

मेहकर शहरात 10 जुलै ते 12 जुलै पर्यंत 3 दिवस जनता कर्फ्यू

मेहकर : शहरात कोरोना चा वाढता संसर्ग पाहता कोरोना चेन ब्रेक करण्यासाठी मेहकर शहरातील व्यापारी असो. ने मेहकर शहरात दिनांक १० जुलै शुक्रवार पासून १२ जुलै रविवार पर्यंत ३ दिवस जनता कर्फ्यू लावन्याचे आव्हान केले आहे.
या सबंधीची व्यापारी असो,प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची एक बैठक स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हॉल मध्ये पार पडली या बैठकीस जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव,आमदार डॉ. संजय रायमुलकर,उपविभागीय अधिकारी गणेश राठोड़, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप तड़वी,ठानेदार आत्माराम प्रधान,नगर परिषद मुख्याधिकारी सचिन गाड़े इत्यादी उपस्थित होते.सदर बैठकीत किराणा असो, कृषी केंद्र संचालक असो, सराफा असो, कपड़ा व्यापारी असो, मेडिकल असो, तसेच छोटे व्यापारी असो चे पदाधिकारी उपस्थित होते या वेळी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर सावधानता बाळगण्यासाठी व मेहकर शहरात कोरोना ची संसर्ग चैन तोडण्यासाठी सर्वसहमति ने ३ दिवस अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेऊन कडकडित जनता कर्फ्यू ठेवण्याचे आव्हान खासदार प्रतापराव जाधव यांनी केले या आवहानाला उपस्थित सर्व व्यापारी बांधवांनी प्रतिसाद देत शहर कोरोना मुक्त करण्यासाठी ३ दिवस म्हणजेच १०,११,१२,
जुलाई रोजी जनता कर्फ्यू पाळन्याचे मान्य केले या जनता कर्फ्यू दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर प्रतिष्ठानें उघडल्यास त्यांचेवर कारवाई करण्याचे अधिकार प्रशासनाला देण्यात आले आहेत.

Related posts

गुंजकर कोचिंग क्लासेस मध्ये NEET, JEE व MH-CET क्रॅशकोर्सची प्रवेश प्रक्रिया सुरू

nirbhid swarajya

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बँकांनी पीक कर्ज वितरणाचे नियोजन करावे – जिल्हाधिकारी

nirbhid swarajya

डॉक्टर-नर्सेस आपल्याच घरातून बेदखल!

nirbhid swarajya
error: Content is protected !!