बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामधील जानेफळ येथे अनेक दुकानांना सकाळी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने पाच दुकाने आगीत भस्मसात झालीय .. या आगीत दुकानमालकांचे लाखोंचे नुकसान झालेय असून अग्निशमन दलाच्या गाडीसह पोलिस घटनास्थळी दाखल होऊन आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले गेलेय .. सध्या आग विझवण्यात यश आले असून आग कशाने लागली याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे .. तर आगीमध्ये व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याने नागरिकही मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते ..ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तविण्यात स्थानिक नागरिकांकडून येत असून यावेळी आगीमध्ये दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याने मोठा आवाज झाल्याची माहिती हि नागरिकांनी दिलॆय .. सध्या आग विझवण्यात यश आले असून पंचनामा सुरूय ..