डॉ.अमित देशमुख यांच्याकडून महिन्याकाठी मुख्याधिकारी आकोटकर यांना अर्थपूर्ण सहाय्य ?
खामगाव : शहरातील शारदा समाज जवळ असलेल्या व्यंकटेश चिल्ड्रन हॉस्पिटल चे संचालक डॉ. अमित देशमुख यांनी त्यांच्या हॉस्पिटल च्या बाजूला असलेल्या सर्विस गल्ली वर खूप मोठ्या अतिक्रमण केलेले आहे. या सर्विस गल्लीच्या मधातून परिसरातील नागरिकांच्या घरातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता नगरपालिकेच्या वतीने ३ लाख ८८ हजार रुपयांची तरतूद करून नाली बांधकामाचे टेंडर काढले होते, परंतु सर्विस गल्ली वर डॉ.अमित देशमुख यांनी भले मोठे अतिक्रमण करून ठेवल्यामुळे नालीचे काम पूर्ण होऊ शकले नाही. अनेक वेळा विविध निर्भिड स्वराज्य ने वृत्तपत्रातून अवैध अतिक्रमणाच्या बांधकामाविषयी बातम्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या. मात्र कुंभकर्णी झोपेत असलेले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आकोटकर यांनी याकडे कुठलेही लक्ष दिले नाही किंवा कुठल्याही प्रकारची कार्यवाही याठिकाणी केली नाही. डॉ. अमित देशमुख यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे नालीचे काम रखडले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सांडपाण्याचा सुद्धा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वेळा वारंवार निवेदन, माहिती देऊनही नागरिकांच्या समस्या दूर होताना दिसत नाही आहे त्यामुळे आता नागरिक कमालीचे त्रस्त झालेले दिसत आहे. मात्र एकीकडे डॉ. अमित देशमुख अवैध अतिक्रमण केल्याप्रकरणी नगरपरिषद चे मुख्याधिकारी आकोटकर यांना महिन्या काठी अर्थपूर्ण सहाय्य तर करत नाही आहेत ना ? अशी चर्चा शहरातील नागरिकांमध्ये तसेच नगरपरिषद मधील काही कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचेही दिसून आले आहे.