खामगांव: येथील हिरा नगर येथे एक इसम दारू विक्री करत असल्याची गुप्त माहिती खामगाव शहर पोलीस स्टेशन च्या महिला पोलीस कॉन्स्टेबल मोनिका किलोलिया यांना मिळाली होती त्यांनी या मिळालेल्या माहितीच्या आधारे हिरानगर येथे छापा टाकला असता तेथे अतुल वासुदेव सुकाळे रा. शिवाजी नगर जुना फैल हा जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बुलढाणा यांच्या आदेशाचे उल्लंघन करून संपूर्ण देशी विदेशी दारू विक्री ची दुकाने बंद असल्याबाबत शासनाने आदेश दिलेले असतानासुद्धा अतुल वासुदेव सुकाळे हा रात्रीच्या सुमारास हिरानगर वस्तीमध्ये देशी व विदेशी दारूची अवधी द्या विनापरवाना दारूची विक्री करताना महिला पोलिस कॉन्स्टेबल मोनिका किलोलिया यांच्यासह पोलिसांना मिळून आला त्याची झडती महिला पोलिसांनी त्याच्या जवळून देशी व विदेशी कंपनीची दारू किंमत 4 हजार 66 रुपये असा मुद्देमाल त्याच्याजवळून जप्त करण्यात आला. तर याप्रकरणी पोहेका विनोद कैलास शेळके यांनी शहर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी अतुल वासुदेव सुकाळे याच्याविरुद्ध भादवि कलम 188, 269, 270, भादवि सहकलम राष्टीय आपत्ती व्यवस्थापन अधि. 2005 कलम 51(ब) सहकलम 3 साथीचे रोग अधिनीयम , कलम 65 ई मदाका नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
previous post
next post