गोदामाची चौकशी करणारे नागपूर चे एफ सी आय अधीकारी लाखोत मॅनेज
खामगांव : जिल्ह्यातील खामगाव-अकोला रोड वरील टेंभुर्णो परीसरातील ब्ल्याक स्टोन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कडून एफ सी आय ने धान्य साठविण्यासाठी व ते धान्य पुढे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात राशन दुकानात पाठवण्यासाठी गोदामे भाड्याने घेऊन करारनामा केलेला आहे. त्या गोदामातून कोट्यावधी रुपयांचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी पाठविले जाते अशी चर्चा सुरू आहे.

तसेच या गोदामाच्या गैरकारभार विषयी काही महिन्यांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते निलेश मिस्त्रा यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे सदर गोदामांची चौकशी करण्यासाठी नागपूर येथील एफ सी आय अधीकारी व कर्मचारी आलेले असुन गोदामांची चौकशी व धान्य मोजनी सुरू असताना गोदामात धान्याचा साठा कमी आढळून आला त्या नंतर सदर नागपूर येथून आलेल्या अधिकाऱ्यांना लाखो रुपये देऊन मॅनेज करण्यात आले आहे. तरी एफ सी आय च्या मुख्य अधिकारी यांनी व संबंधित केंद्रीय मंत्री यांनी या खामगांव येथील गोदामात धान्य साठा कमी आढळून सदर चौकशी अधीकारी मॅनेज झाल्या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी ज्यांच्या हक्काचे राशन चोरीला जात असलेल्या गोरगरीब नागरिकांकडून होत आहे.

गोदामातून कोट्यावधी रुपयांचे धान्य गोदाम व्यवस्थापक राहुल मच्छिंद्र व एफ सी आय ला गोदामे भाड्याने देनारी ब्ल्याक स्टोन कंपनी चे संचालक सागर बट्टेवार, सह इतर संचालक तसेच सागर बट्टेवार यांचा अत्यंत जवळचा विश्वासू “मामा” नामक इसम धान्य गोदामातून गायब करून काळ्या बाजारात विकत असल्या ची खमंग चर्चा शहरात सुरू आहे. गोदामातून धान्य गायब होते कसे व कोण करते याचीसुद्धा माहिती घेणे आता गरजेचे झाली आहे. अन्यथा गोरगरीब जनतेच्या हक्काच राशन श्रीमंत ” जय ” च्या घश्यात जात राहिले तर तो “कु” मार कोणाला बसणार व याला जबाबदार कोण ? हेसुद्धा पाहणे तेवढेच महत्त्वाचे आहे.