जळगांव जामोद: महाराष्ट्र हे उद्योग व्यवसायात देशात प्रगत असलेले राज्य अशी ओळख संपूर्ण देशात आहे.गेल्या ६० वर्षात अनेक मोठमोठे प्रकल्प महाराष्ट्रात आले कारण आपल्या राज्यातील वातावरण उद्योगधंद्याकरीता पुरक असल्याचे परकीय गुंतवणुकदारांना सुध्दा वाटते.परंतु गेल्या ४ महिन्यामध्ये अनेक मोठे प्रकल्प आपल्या राज्यातुन निघुन जात असल्याने निदर्शनास येते. यामध्ये सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे वेदांता फॉक्सकॉन.ज्या प्रकल्पामध्ये लाखो बेरोजगारांना रोजगाराची संधी होउ शकली असती.तो प्रकल्प मंजुर होउन त्यासाठी जागा सुध्दा निश्चीत झाली होती.तो प्रकल्प अचानक गुजरातला जाणे महाराष्ट्रातील युवकांसाठी क्लेषदायक आहे.महाराष्ट्र राज्यातील लाखो युवक यामुळे रोजगारापासून वंचित राहिले. तसेच त्यानंतर अनेक छोटे मोठे प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याने दिसते. त्पामध्ये दोन तीन दिवसाआधी टाटा एअरबस हा प्रकल्प २२ हजार करोड रुपयांचा सुद्धा महाराष्ट्रातून गुजरातला मंजुर झाला.हजारो तरुण ज्या प्रकल्पामध्ये सुध्दा रोजगाराची संधी शोधत होते. परंतु महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे तो प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटुन गेला. याचा आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगांव जामोद तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो.तसेच ताबडतोब राज्य सरकारने हस्तक्षेप करत गेल्या काही महिन्यामध्ये राज्याबाहेर गेलेले प्रकल्प राज्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत प्रेषक लिपीक अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रमोद सपकाळ,जिल्हा सरचिटणीस संदिप उगले, युवक जिल्हा कार्याध्यक्ष पराग अवचार, युवक विधानसभा अध्यक्ष दत्ता डिवरे,माजी नगरसेवक शेख जावेद,अल्पसंख्यक जिल्हा कार्याध्यक्ष एम.डी.साबीर,महादेव भालतड़क, आशिष वायझोडे,युवक तालुकाध्यक्ष अनूप महाले, ईरफान खान,योगेश बोराखडे, सिद्धार्थ हेलोडे, संदिप ढगे,रेहान अहमद,मुस्तकीम मिर्झा,सदाशिव जाणे,पवन वारे,रोशन बुले,प्रशांत गावंडे,वसीम पटेल,कासम उमेद, दादाराव धंदर,निजाम राज,आकाश ठाकरे,खालिद माही,मोईन राज, गौरव अवचार,शाहरुख तड़वी,शिवा वरखेड़े,शाहिद तड़वी,अमान खान यांच्यासह शेकडो युवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.