खामगाव : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा नालीवरील अतिक्रमण परत ‘जैसे थे’ झाले आहे. त्यातही बेशिस्त वाहनधारकांची भर पडत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.परिणामी रस्ता अरुंद होत असल्याने अपघाताच्या संख्येत भर पडत आहे.शहरातुन जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गावर बसस्थानक चौक ते गो. से महाविद्यालयापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नालीवर अतिक्रमण करुन कच्ची-पक्की दुकाने धाटण्यात आली आहेत. काही दिवसापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अतिक्रमण काढण्यात आले होते. परंतु काही दिवसातच परत अतिक्रमण करण्यात आले आहे.या महामार्गावरील बहुतांश वर्दळीच्या ठिकाणी दुचाकी,चाराचाकी वाहने स्त्यावरच उभी करण्यात येत आहेत. तर काही बेशिस्त वाहन धारक आडवी-तेडवी वाहने उभी करीत असल्याने रस्ता अरुंद होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. परिणामी लहान-सहान अपघाताचे प्रमाण वाढले आहे.अधून-मधून शहर पोलिसांकडून बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतो.माञ कालांतराने जैसे थे स्थिती निर्माण होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
अमरावती खामगाव जिल्हा नांदुरा पुणे बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय विदर्भ विविध लेख शिक्षण शेगांव शेतकरी